१६ टँकरने पाणीपुरवठा सुरू
पैठण, (प्रतिनिधी) : तालुक्यातील ११ गावांमध्ये उन्हाळ्याच्या तीव्रतेसोबतच पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत चालले असल्याचे चित्र समोर आले आहे. एका गावात एक दोन टँकर च्या खेपा त्याही वेळेवर होत नसल्यामुळे ११ गावांमध्ये खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू जवळपास २७९७७ हजारांहून अधिक लोकसंख्या या व्यवस्थेवर असून
अवलंबून आहे. मात्र तरीही नागरिकांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या पैठण तालुक्यातील टाकळी आंबड लोकसंख्या ४८००, राजणगाव खुरी लोकसंख्या ४५००, राजणी बलाळपूर लोकसंख्या १२५५, आडुळ खुर्द लोकसंख्या २०००, अब्दुलापूर तांडा लोकसंख्या १२५०, खादगाव लोकसंख्या ३९८६, केकत जळगाव लोकसंख्या ४९००, दरेगाव २३५०, दारखेडा बंगला तांडा, नरसिंह तांडा लोकसंख्या १८७६, यासीनपूर, बेलदरी तांडा लोकसंख्या ४५०, सुंदरवाडी ६१० असे एकूण २७९७७ लोकसंख्येसह यांसह इतर वाड्या तांड्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. बहुतांश गावांमध्ये शासकीय टैंकर मंजूर असले तरी प्रत्यक्षात होणाऱ्या खेपांची संख्या मर्यादित असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार गावकन्यामार्फत करण्यात येत आहे.
टँकर भरण्यासाठी एमआयडीसी मुदलवाडी जल विशेष म्हणजे अनेक गावांना २ ते३ किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याने वेळ व खर्च दोन्ही वाढत आहेत. काही ठिकाणी खाजगी विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी त्यातूनही संपूर्ण गरज भागत नाही. पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सामाजिक व आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. प्रशासनाकडे टँकरच्या खेपा वाढवण्याची तसेच कायमस्वरूपी जलयोजना राबवण्याची मागणी अनेक गावातील महिलांनी केली आहे.
महिला, नागरिकांना शुद्धीकरण केंद्र, महानगरपालिका पारोळा जल शुद्धीकरण केंद्र, एमआयडीसी खोडेगाव जल शुद्धीकरण केंद्र या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. दररोज २९ टैंकर खेपा अपेक्षित असताना काही ठिकाणी पुरवठा अपुरा पडत आहे.
उन्हाचा पारा वाढत असताना पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत आहेत गावाची मागणी आल्यानंतर टँकर सुरू करण्यात येतील.
- राजेश कांबळे, पाणी पुरवठा अधिकारी, पंचायत समिती पैठण













